Back to feed
I
Ishaan Rao Good_Morning · Marathi · Life

लोखंडाच्या एका सळीची किंमत २५० रुपये. त्यापासुन घोड्याचे नाल बनवले तर त्याचे मुल्य होते १००० रुपये. त्यापासुन सुया बनविल्या तर त्याचे मुल्य होते १०,००० रुपये. त्यापासुन घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग्ज बनविल्या तर त्याचे मुल्य होते १,००,००० रुपये. तुम्ही स्वतः काय आहात यावर तुमचे मुल्य ठरत नाही. तर तुम्ही स्वतःला काय बनवता यावर तुमचे मुल्य ठरते.. आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचं हे आपल्याच हातात आहे.!!! "आपण एक दाणा पेरला असता, आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ? धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं . पण ईश्वरानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे. आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो. अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ? दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच रिटर्न मिळेल.., आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असेल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून रिटर्न मिळणार यात काहीच शंका नाही! *सावधान * *"पेरणी चालू आहे.."* *काय पेरायच हे आपल* *आपणच ठरवायच* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

156 likes 90 shares
WhatsApp