लाडात वाढलेली लेक मांडवात उभी पाहुन हसर्या चेहर्यानं बाप मुसमुसत होता राहुन राहुन // धृ// कोपर्यात उभा बाप अक्षता टाकत होता घाम पुसायच्या निमित्ताने डोळे पुसत होता //1// काळजाच्या तुकड्याला पाहुन आतुन तुटत होता " पोरीचं चांगलं झालं " हसुन म्हणत होता //2// अश्रुंचा बांध त्यानं अडवुन धरला होता डोळयासमोरुन लेकिचा चेहरा दुर होत नव्हता //3// लग्न लागल्यावर सारेच टाळ्या वाजवत होते एक तोच मात्र आसवांमध्ये भिजत होता //4// लहानमोठ्यांना तो हात जोडत होत " लेकिला जीव लावा माझ्या " डोळे भरून सांगत होता //5// सायंकाळी सारे पाहुणे खिचडीभात खात होते बापाचा हात न वाजणार्या फोनकडे जात होता //6// लेकिचा फोन येताच " मिरची तिखट आहे " म्हणत तांब्यानं पाणी पित होता अन डोळयातलं आसव मागं सारत होता.... सुगी संपल्यावर पाखरांसारखा एकेक पाहुणा परतत होता शेवटच्या पाहुण्याला पोहचवुन " मला भुक नाही "असं बाप म्हणत होता //8// बेडरूममधील लेकीचं कपाट हळुच बाप उघडत होता तिने ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवत होता //9// तिथच बेडवर बसुन ओंजळीत तोंड धरून बाप आवाज न करणार्या धबधब्यासारखा फुटत होता//10// मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको " आई " होत होती वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरून काळजाच्या तुकड्याला आठवुन आसवांमध्ये भिजत होती.. //11// हे अस नात वडील आणि मुलगी.. म्हणून म्हणतो एक तरी लेक असावी. डोळ्यातील प्रत्येक थेंबात दिसणारी.. ✍🏻✍🏻✍🏻 🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 आज जागतिक कन्या दिन. ज्यांना कन्यारत्न आहेत अशा सर्वांना जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा 💐
246 likes
17 shares