Back to feed
V
Vanya Nair friendship · marathi · friendship

लफडी 😂😂😂😂😂 . . बॉसने सेक्रेटरीला फोन केला , "" एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत . त्यासाठीची सगळी व्यवस्था कर ."" . . सेक्रेटरीने नव-याला फोन केला , "" एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर ."" . . . नव-याने प्रेयसीला फोन केला , "" एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे . तू माझ्या घरीच राहायला ये ."" . . . प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला , "" मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे . तुला ट्यूशनला सुट्टी ."" . . विद्यार्थ्याने बाबांना फोन केला , "" बाबा , माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे . मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला ."" . . . बाबांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला , "" हा आठवडा मी माझ्या मुलाबरोबर घालवणार आहे . बाहेरगावी जाणे रद्द ."" . . . सेक्रेटरीने नव-याला फोन केला , "" बाहेरगावी जाणे रद्द ."" . . . नव-याने प्रेयसीला फोन केला , "" आपली भेट रद्द ."" . . . प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला , "" माझे जाणे कॅन्सल झाले आहे . तुझी ट्यूशन सुरूच राहील ."" . . . विद्यार्थ्याने बाबांना फोन केला , "" ट्यूशन सुरूच राहणार आहे . आपलं जाणं रद्द 😂😂😂😂😂😂 पृथ्वी गोल आहे आणि सगळा झोल आहे.

13 likes 85 shares
WhatsApp