व्याख्या ज्या हसवतील* 😃😄😃😄😜😜 💠 *पेन :* दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू. 💠 *बाग :* भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा. 💠 *चौकशीची खिडकी :* "इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा. 💠 *ग्रंथपाल :* वाचकाने मागितलेले पुस्तक "बाहेर गेले आहे" असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस. 💠 *विद्यार्थी :* आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित राहणारा एक जीव. 💠 *कार्यालय :* घरगुती ताण-तणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा. 💠 *जांभई :* विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी. 💠 *कपबशी :* नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू. 💠 *कॉलेज :* शाळा व लग्न या मधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण. 💠 *चंद्र :* कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी ग्रह 💠 *अनुभव -* सभ्य शब्दात मांडलेल्या चुका 💠 *मोह -* जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो 💠 *शेजारी -* तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो. 💠 *सुखवस्तू -* वस्तुस्थितीत सुख मानणारा. 💠 *वक्तृत्व -* मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे. 💠 *लेखक -* चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा. 💠 *फॅशन -* शिंप्याच्या हातून झालेल्या चुका. 💠 *पासबुक -* जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव. 💠 *गॅलरी -* मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा. 💠 *लेखणी -* एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन. 💠 *छत्री -* एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ. 💠 *परीक्षा -* ज्ञान तपासून घेण्याचे एक "हातयंत्र". 💠 *परीक्षा -* पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ. 💠 *विश्वशांती -* दोन महायुद्धांच्या मधला काळ. 💠 *दाढी -* आळशीपणा व "कुरुपपणा" लपवण्याचे" रुबाबदार" साधन. 💠 *थाप -* आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात. 💠 *काटकसर -* कंजूषपणाचे एक "गोंडस" नाव. 💠 *नृत्य -* पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला. 💠 *घोरणे -* नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी. 💠 *मन -* नेहमी चोरीस जाणारी वस्तू. 💠 *ब्रह्मचर्य -* कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग. 💠 *विवाहित माणूस -* जन्मठेपेचा कैदी. 💠 *विधुर -* जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी. 💠 *श्रीमंत नवरा -* चालतं बोलतं ATM कार्ड. 💠 *श्रीमंत बायको -* अचानक लागलेली लॉटरी. 😅😅😅😅😅😅😅😅👌👌👌
P
Prisha Mishra
life · mixed · life
166 likes
29 shares