व्यथा गरीबाची कथा सामान्य माणसाची... मोदि साहेब निर्णय तुंमचा अप्रतीम लक्षणीयच होता | तिथं थोडासा गरीबांचा तरी विचार करायला हवा होता ||१|| माहित नसेल तुंम्हाला आहो महिण्याच्या पगाराच्या येतात फक्त आठच नोटा | तुंम्हीच सांगा गरीबाकडे पैसा कसा असेल हो खोटा ||२|| आज हाती घेतलेला पगार गरीबाचा ऊद्यावर जाईना | हाती बिचाऱ्याच्या शेवटी शेवटी काहीच पैसा ऊरेना ||३|| आधी ऊधार पैसे मागीतले तरी कुणीही सहज काढुन देत होतं | पैसा नसता हाती तेंव्हा ते एक गरीबाचं क्षणाचं साधन होतं ||४|| मोदि साहेब तुंम्ही माझ्या सारख्या गरीबाचाही एक निर्णय अमलात आणा | एवढीच एका गरीबानं मांडलेली व्यथा तुंम्ही मनापासुन जाणां ||५|| बघा सरकारी कर्मचाऱ्यांना सातवं वेतन लागु झालं | आंम्हा खाजगी कामगारांना निदान पहीलं वहिलं वेतन तरी चालु कराना ||६|| ज्याच्या त्याच्या शिक्षणा नुसार तुंम्ही वेतन श्रेणी ही ठरवाना | कामगार आपला मर मर मरतोय त्याचा थोडा तरी विचार कराना ||७|| शिक्षण असो अथवा नसो संसार हा सर्वांना सारखाच आहे ना | प्रत्येकाचा खर्च हा कमी जास्त होईल तिथे दुजा भावचं नको ||८|| नको वेतन लाख भरं पण दोन वेळेचं अन्न पुरेल येवढं तरी येवु द्या हाती | शोध घ्या तुंम्ही आणी बघा बायको पोरांच्या नावे किती आहेत खाती ||९|| एका कुटुंबासाठी किती येतो खर्च,ह्याच थोडस गणित करानां | एक तर महागाईन डोक वर काढलयं,थोडं गरीबाकडे ही बघानां ||१०|| आता तुंम्हीच सांगा कुठुनं येणार गरीबाकडे साटवलेलं काळं धनं | येवढी माया जमाकरायला असावं लागत एक कट्टर मनं ||११|
255 likes
47 shares