Back to feed
D
Diya Bose Family · Mixed · Family

वयाबरोबर मुलाचे आपल्या बापाबद्दलचे मत कसे बदलत जाते ते बघा ! ४ वर्षाचा असताना – माझे बाबा ग्रेट आहेत ! ६ व्या वर्षी – माझे बाबा सर्वज्ञ आहेत ! १० व्या वर्षी – बाबा चांगले आहेत पण लगेच भडकतात ! १२ व्या वर्षी – मी लहान असताना बाबा माझे खूप लाड करायचे ! १४ व्या वर्षी – माझा बाप फारच काटेकोर आहे बुवा ! १६ व्या वर्षी – माझ्या बापाला जगरहाटी / दुनियादारी समजतच नाही ! १८ व्या वर्षी – माझा बाप म्हणजे जमदग्नीचा अवतार आहे ! २० व्या वर्षी – बाप अगदी डोक्यात शिरतो, आई त्याच्याबरोबर संसार तरी कसा करते ? २५ व्या वर्षी – मी काहीही करायला गेलो तरी बापाची आपली नकारघंटा असते ! ३० व्या वर्षी – माझा पोरगा तर अगदी डोक्यावरच बसतो माझ्या ! मी तर या वयात वडीलांना टरकून असायचो ! ४० व्या वर्षी – मी वडीलांच्या करड्या शिस्तीत वाढलो आहे, मी सुद्धा मुलाला शिस्त लावली पाहिजे ! ४५ व्या वर्षी – खरेच कमाल आहे, बाबांनी संसाराचा गाडा कसा बरे ओढला असेल ? ५० व्या वर्षी – आम्हाला मोठे करण्यासाठी बाबांनी किती खस्ता खाल्ल्या असतील ? मला तर एका मुलाला सांभाळणे भारी पडते आहे ! ५५ व्या वर्षी – आमच्या बाबतीत बाबांनी किती दूरचा विचार करून ठेवला होता, त्यांच्या सारखे तेच ! ६० व्या वर्षी – माझे बाबा ग्रेट आहेत ! Father is always great...🙏

144 likes 48 shares
WhatsApp