Back to feed
A
Asha Singh life · marathi · life

वेल एकाकी आयुष्य म्हणजे असतो एक निष्पर्ण रूक्ष वृक्ष जणू भकास, नुसताच बेढब पसरलेला उजाड डोंंगराचे केंद्र स्थान भुषवल्यासारखा स्वतः च्या निरूपयोगी अपेक्षांच्या पारंब्या स्वतः च्या च अंगावर झुलवणारा त्याला ही असते गरज एका निरागस सहेली ची लपेटून साथीने वाढणा-या एका नाजूक वेली ची कारण, त्याला ही त्या वेलीसह बहरायचे असते झुऴझुऴ वा-यासमवेत लहरायचे असते नाजूक शिळीचे सुमधूर गीत त्यालाही तिच्यासह गायचे असते त्या वेलीच्या सुखदुःखात त्याला स्वतः ला ही सामावून जायचे असते हर्षोल्हासाच्या तरल क्षणांच्या हलक्याश्या सरींत त्यालाही तिच्यासह भिजायचे असते कठोर दाहक उनाच्या चटक्यांना ही जोडी जोडीने सहन करायचे असते तिच्या तलम हव्याहव्याशा सहवासाच्या मादक फुलांनी स्वतः च्या मृत मनाला अन् कायेला गंधायचे असते तिच्या गर्द हरीत श्रूंगाराच्या मेंहेंदीला कायमचे च स्वतः चे कणखर अस्तित्व बनवायचे असते, कारण, त्यालाही असते एक वेडे मन तिच्या सारखेच....... वेड्या आशा अपेक्षा मधे एकमेकांना गुंफून जगणारे

149 likes 59 shares
WhatsApp