Back to feed
M
Myra Joshi Family · Marathi · Family

( वेळ काढुन वाचा) 👴 बाबांचा पुनर्विवाह ....... ! पंचेचाळीशितल्या एका व्यापारी तरुणाच्या पत्नीचा अपघाती मृत्यु झाला. आप्तजनांनी, मित्रांनी त्याला दुसर्‍या लग्नाचा सल्ला दिला परंतु "माझ्या पत्नीने मला माझ्या मुलाच्या रुपात एक सुंदर कायमची आठवण दिली आहे. त्याला वाढविण्यातच माझे ऊर्वरीत आयुष्य जाईल, आणि त्यातच माझ्या आयुष्याची मी धन्यता मानेन." असे सांगून त्याने तो सल्ला नम्रपणे नाकारला. बघता बघता बरेच दिवस सरले मुलगा मोठा झाला. पितापुत्र दोघे मिळून आता व्यवसाय करू लागले, दुकानात जाऊ लागले. मुलगा व्यवसायात तरबेज झाल्याचे पाहून वडिलांनी आपला सारा व्यवसाय, संपत्ती, जमीन, जुमला, मिळकत सारं काही मुलाच्या नावावर केलं. वडील आपल्या मित्रांच्या सोबत आपला वेळ घालवू लागले. कधी मुलाच्या दुकानात जाऊ लागले. थोडे दिवसात मुलाचेही लग्न झाले सुंदर साजेशी सुन घरी आली. वडील अगदी निश्चिंत झाले. बघता बघता मुलाच्या लग्नाला एक वर्ष झाले. एके दिवशी वडील घरी दुपारी जेवायला बसले होते, मुलगाही दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता. जेवताना वडिलांनी आपल्या सुनेला दही मागितले, यावर सुनेने दही संपले आहे असे सांगितले. जेवण झाले. हात धुवून वडील बाहेर दिवाणखान्यात सोफ्यावर आरामात वर्तमानपत्र वाचत बसले होते. मुलगा अजून जेवत होता. त्यानेही आपल्या बायकोला दही मागितले. तीने दुभत्याच्या कपाटातून दह्याचे भांडे काढून त्याला दही वाढले स्वतःलाही वाढून घेतले. जेवणानंतर मुलगा काही न बोलता परत दुकानात गेला. दुसर्‍या दिवशी सकाळी मुलगा आपल्या वडीलांना म्हणाला "बाबा आज तयार व्हा आपण तुमच्या लग्नाची बोलणी करायला जाणार अहोत."वडीलांना आपले काय चुकले हेच समजेना, सावरत ते मुलाला म्हणाले "बाळा आता या वयात मला लग्नाची काय गरज आहे, तुला सुद्धा आजपर्यंत मी अगदी प्रेमाने, तुझ्या आईची कमतरता न भासू देता लहानाचा मोठा केला आहे, अर्थातच तुलाही आता दूसर्‍या आईची गरज नाही." यावर मुलगा म्हणाला बाबा मला तुमच लग्न करायच आहे ते तुम्हाला दही वाढणारी आणण्यासाठी. ऊद्या पासून मी आणि माझी बायको भाड्याच्या घरात रहायला जातोय आणि त्याचबरोबर मी ऊद्यापासून तुमची सारी मालमत्ता, दुकान तुमचा सारा व्यवसाय तुमच्याच नावावर परत करतोय आणि तुमच्या दुकानामध्ये एका सामान्य कामगाराप्रमाणे काम करणार आहे. हे असं झाल्याशिवाय एक वाटी दह्याची किंमत माझ्या बायकोला समजणार नाही. कथा काल्पनिक आहे परंतु समस्या अगदी गंभीर आहे ! आणि खरोखरच आज अशा संयमी आणि समंजस मुलांची समाजाला अत्यंत आवश्यकता आहे. मातापित्यांचे, मातृभाषेचे, गुरूजनांचे, देशाचे, समाजाचे ऊपकार कधीच फिटणारे नाहीत. परंतु त्याचबरोबर आपले कर्तव्य कोणीही टाळू शकत नाही.■ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 ज्याने हे ऊपकार आपल्या बापावर करुन स्वता भाड़ोञी घरात राह्याला गेला आणि बापाची काय किंमत आहे हे बायकोला अक्कल घाण ठेवाया भाग पाड़ले त्या " इज्जतदार " मुलाला मानल पाहिजे . 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼

210 likes 48 shares
WhatsApp