*विविध राशींच्या बायका फराळाला घरी बोलावल्यावर कसे स्वागत करतात ते बघा* ~ *मेष* समोर डिश ठेवून घ्या. ...एवढेच म्हणणार....आग्रह वगैरे नाहीच.गप्प बसून राहणार.....🤓 येणा-याला कुठून आलो असे होते.😂 *वृषभ* यांची त-हाच वेगळी....डिश पुढे ठेवून इतका आग्रह करतील .....की पाहुण्याची वृश्चिकेची फटकळ पत्नी म्हणते....."अहो खातो आम्ही आमच्या हाताने भरवू नका."🤓🤓 *मिथून.* कुठल्याच बाबतीत सिरियसनेस नाही."अय्या खरंच आलात की तुम्ही",आता आमची चकली खाऊनच जा.तुटली तर तुम्ही जिंकलात."ह्याह्याह्या....😂 *कर्क* कायम धास्तावलेल्या बरं का!!या वेळेस मोतीचूर लाडू घरी बनवलेले नाहीत.समोरच्या दुकानातून आणलेत.तूप चांगलं वापरत नाही म्हणे....पण आम्ही खाल्ले"....घ्या ना....😂 *सिंह* मला अनारसे बनवता येत नाहीत.ते मागू नका....आणि मुलाला बोलावले नसताना घेऊन आलाय.सांभाळा त्याला.....😀 *कन्या* .इतका वेळ डिश पुसत बसणार की मेषेचा पाहुणा स्वतःच्या खिशातल्या रूमालाने डिश पुसून फराळ वाढून घेतो.😂 *तूळ* ताजं द्यायला हवं हे इतकं डोक्यात बसलेलं असत.की पाहुणे आल्यावर लाडु वळायला घेतात.😂😂 *वुश्चिक* मुलुखमैदान तोफ😂 पाहुण्यांसमोरच नव-याला ओरडणार.. "सक्काळपासून 5बेसनलाडू हादडून झालेत.आता यांच्याबरोबर अजून एक कसला घेताय?"😡😠😂 *धनू.* मला नेहमी काहीतरी हटके आवडतं म्हणून रूटीन फराळाचं न देता मस्त फोडणीची पोळी देते." बिचारा कर्केचा पाहुणा निमूटपणे ते अन्नब्रह्म गिळतो. *मकर* आता महागाई इतकी झालीय....त्यात यांना बोनस ही नाही मिळाला.उगा तुम्हाला बोलावलेय म्हणून केलं सगळे " पाहुणा बघत राहतो.😆 *कुंभ* दिवाळी दरवर्षीच येते पण आयुष्याचा भरवसा नाही.पुढच्या वर्षी तुम्ही असाल नसाल म्हणून आत्ता बोलावलेय."😂 *मीन* अहो तुम्हाला बोलावलेय हे विसरले...."ए चिंटू समोरच्या मिठाईवाल्याकडून आण सगळे पाव पाव किलो हे काही जास्त खात नाहीत"😂
R
Reyansh Gupta
humor · marathi · humor
131 likes
21 shares