Back to feed
K
Kunal Joshi rain · marathi · rain

व्हर्च्युअल रोमान्स....... शुक्र तारा, मंद वारा, गूगल वर व्हेदर पहा... वायफाय आहे, ब्रॉडबैंड आहे , चांदणे स्क्रीनवर पहा... फेसबुक वरती शेअर करुनी, माझी तू काँमेंट पहा तू सदा ऑनलाइन रहा... मी कशी फेसबुकवर सांगू भावना माझ्या तुला... तू मला समजुन घे रे व्होंट्सअप वरूनी साजणा... मेसेजिंगचा छंद माझा आज तू पुरवून पहा... तू सदा ऑनलाईन रहा... लाजरा तू फ्रेंड माझा मेसेंजर उघडून पहा व्हायबर आणि स्काईप वरुनी तू माझ्या डोळ्यात पहा हेडफोन आणि माईक लावुनी तू आता युट्यूब पहा... तू सदा ऑनलाईन रहा... शोधिले मी नेटवरुनी पीसी टॅब मोबाईल वरी फ़ोटो बनुनी आलास तू रे आज माझ्या फेसबुक वरी... भरलिस माझी रँम सारी हँग झाले मी पहा... तू सदा ऑनलाईन रहा...

176 likes 53 shares
WhatsApp