Back to feed
N
Nisha Joshi humor · marathi · humor

शिक्षक: रावणावर निबंध लिहा... रावणावर निबंध..! "रावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे... रावण १०-१० टोप्या घालायचा... रावणाच्या दहा तोंडांसाठी मंदोदरीला दहा वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक बनवावा लागत असे. दहा ताटे व दहा वाढपीही लागत. शिवाय एकाच वेळेला १० प्रकारच्या मुखशुद्धी पावडरी पण खायचा. तो जेवणानंतर चूळ भरताना समुद्र खवळल्यासारखा आवाज येई. लहानपणी रावणाचे दात घासायला त्याच्या आईने दहा वेगळे ब्रश आणले होते.....एका तोंडाचे इन्फेक्शन दुसर्‍या तोंडाला होऊ नये म्हणून ....! लहानपणी रावणाच्या आईला त्याच्या नक्की कुठल्या तोंडात भडकावून द्यायची हा प्रश्न पडायचा. कुठच्याही साध्या म्युझिक सिस्टिमवर गाणं लावलं तरी रावणाला ते डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड ऐकू यायचं. रावण कधीच कुशीवर झोपू शकायचा नाही. रावणाला कधीच टी शर्ट,शेरवानी अगर झब्बा घालता आला नाही. रावण एका तोडांने पान खायचा व सर्व तोंडे लाल व्ह्यायची. करण ती ईंटरकनेक्टेड होती अशी माहीती एका गाईडने सांगितली होती. रावण सलून मध्ये गेला कि न्हाव्याला त्याचे काम दिवसभर पुरत असे. आणि सर्वात महत्वाचे रावण हा"पायाळु"होता. मंदोदरी कपाळावर दहा कुंकवाचे ठिपके लावीत होती. दिवाळीत दहा डोक्यांना लावायला सुगंधी तेलाच्या दहा बाटल्या आणत असे. पाडव्याची अंघोळ रावण रात्री करीत असे कारण सर्व डोकी चोळेपर्यंत रात्र होई असे संशोधकांचे मत आहे. रावण एकटाच समूह गीत म्हणायचा..😛😝 रावण एकटाच लंकन आयडॉल मध्ये भाग घ्यायचा आणि महाफायनलचा महाविजेता व्हायचा. होळीला रावण एकटाच दहा वेगवेगळ्या स्टाईलने बोंबलायचा. रावणाच्या लग्नात मंदोदरीच्या वडिलांनी 10 हारांची ऑर्डर नोंदवली होती. 😝😜 रावणाला ढेकर आला की त्याला कुठल्या तोंडाने बाहेर काढावा हे समजत नसे. 😝😜 रावण एक्टाच ग्रुप डिस्कशन करत असे... मास्तरानी स्वत:ला पेटवून घेतले आहे. 😁😳😬😂😆😛😝 . 😀😃😄😛😝😜😂😁😆 मनमोकळं हसा. ..!

172 likes 42 shares
WhatsApp