Back to feed
K
Kavya Agarwal Humor · Mixed · Humor

शाळा सोडताना.... खरं म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं, शाळा सोडण्यात एवढ़ं काय विशेष होतं; . . . . मुली मात्र शेवटच्या दिवशी सारख्या रडत होत्या, . . . . सरांपासून शिपयां पर्यंत सर्वांच्या पाया पडत होत्या; . . . . मला आठवतंय आम्ही रडणा-या मुलींची जाम खेचली होती, . . . . खरं तर डोळ्यातलं पाणी लपवताना आमची ही गोची झाली होती; . . . . एकमेकांकडे पाहुन लगेच सावरलं आम्ही स्वत:ला, . . . . मनाशीच म्हटलं आता उगीच रडायाचं कशाला? . . . . भले शाळेतली काही जुनी "नाती" तुटतील, . . . . त्यात काय एवढं कॉलेज मध्ये "नवीन" भेटतील... . . . . दिवस, वर्षं कशी जातील कळणार नाहीत, . . . . पुन्हा कधी पावलं इथे वळणार नाहीत... . . . . रडावसं वाटत होतं पण कुणीच रडलं नाही, . . . . शाळेतुन बाहेर पडताना वळुन ही पाहिलं नाहीं.... . . . . पण आता मात्र मनापासून शाळेत जावसं वाटतंय, . . . . शेवटच्या बाकावर बसावसं वाटतंय... . . . . शाळेतल्या तासांपेक्षा सुट्टीचीच सर्वाना ओढ़ असायची, . . . . कारण तेव्हाच सर्वांना "आपली माणसं" भेटायची.... . . . . आज मात्र बरोबर कुणीच नसतं,शाळेच्या आठवणीने रडताना; असं वाटतं तेव्हाच रडायला हवं होतं;शाळा सोडताना........ I Miss my school days a lot.... : आठवा ते दिवस... डोळ्यात पानी येईल... पुन्हा नाही येणार हे दिवस...

224 likes 59 shares
WhatsApp