Back to feed
R
Rudra Bagale social · marathi · social

शाळेत इन्स्पेक्टर येतो आणि एका मुलाला प्रश्न विचारतो :- "शिवधनुष्य कुणी मोडलं?" तो मुलगा :- "मी नाही मोडलं" म्हणून भोकाड पसरतो... 😰😭😭😭😭 इन्स्पेक्टर चकित होतो. 😱 गुरुजींना विचारतो :- "असं काय म्हणतो हा मुलगा?" गुरुजी म्हणतात :- "मुलगा गरीब बिचारा आहे, तो अशी काही तोडफोड करेल असं वाटत नाही." 😳 इन्स्पेक्टर जातो हेड मास्तरांकडे. त्यांना सांगतो. मी "शिवधनुष्य कुणी मोडलं?" असं विचारलं तर तुमच्या शाळेतला मुलगा म्हणतो की "मी नाही मोडलं" गुरुजी म्हणतात की "मुलगा तसं काही करण्यातला वाटत नाही." हा काय प्रकार आहे ...??? 😠 हेडमास्तरांना राग येतो. ते म्हणतात :- "कोण नाही म्हणतो? आत्ता छडी घेऊन आलो ना की सगळे कबूल करतील "मीच मोडलं" म्हणून....!" 😳😳😳🙄🙄 हे सर्व प्रकरण जातं शिक्षण मंत्र्यापर्यंत. शिक्षणमंत्री म्हणतात :- "आता मोडलं ना शिवधनुष्य? चुप बसा. आधीच इतक्या गोष्टी अंगाशी आल्या आहेत त्यात ही एक नको. पुढल्या बजेटला पैसे सँक्शन करतो, नवीन घ्या दोनतीन, आत्ता चर्चा नको...." 🙃🙃😟😟🤔🤔 इन्स्पेक्टर हताश होऊन आपल्या घरी येतो..... 😞 बायकोला म्हणतो :- "एक प्रश्न विचारला "शिवधनुष्य कुणी मोडलं?" तर कुणालाही माहिती नाही. तुला तरी आहे का माहिती?" 🤔 ती म्हणते :- "सकाळपासून काम करून करून मी दमले आहे. त्यात तुम्ही आता येऊन काहीतरी फालतू प्रश्न विचारत आहात. मला काय माहिती हे काय कुणी मोडलं ते...? तुमचं नेहमीचंच आहे, स्वत: मोडायचं आणि दुसऱ्यावर ढकलायचं...!" 😁😆😆😆😆😆😁

190 likes 2 shares
WhatsApp