शाळेत गेलेल्या प्रत्येकाने वाचा! शाळा सोडतान.... खरं म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं, शाळा सोडन्यात एवढ़ कायविशेष होतं, मुली मात्र शेवटच्या दिवशी सारख्या रडत होत्या, सरांन पासुन भाल्याभाऊ पर्यंत सर्वांच्या पाया पडत होत्या, मला आठवतय आम्ही रडनार्या मुलींची खेचली होती, खर तर डोळ्यातलं पाणी लपवताना आमचीच गोची झाली होती, एकमेकांकडे पाहुन लगेच सावरलं आम्ही स्वत:ला, मनाशीच म्हटलं आता उगीचं रडायचं कशाला? भले शाळेतली काही जुनी नाती तुटतील,त्यात काय एवढं Collage मध्ये नवीन भेटतील.... दिवस वर्ष कशी जातील कळणार नाहीत, पुन्हा कधी पावलं इथे वळणार नाहीत.... रडावस वाटत होत पण कुणीच रडल नाही, शाळेतुन बाहेर पडताना वळुनही पाहिल नाही.... पण आता मात्र शाळेत जावसं वाटतय, शेवटच्या बाकावर बसावसं वाटतयं, शाळेतल्या तासांपेक्षा मधली सुट्टीची सर्वांना ओढ असायची, कारण तेव्हाच सर्वांना आपली माणसं भेटायची, आज मात्र बरोबर कुणीच नसतं, शाळेच्या आठवनीने रडताना असं वाटतं, तेव्हा रडायला हवं होतं.शाळा सोडताना....
99 likes
84 shares