Back to feed
A
Avni Bhat patriotic · marathi · patriotic

शाळेत परीक्षेच्या वेळी एका विद्यार्थ्याने आपल्या पुढे बसलेल्या विद्यार्थ्याला शंभर रुपये दिले आणि त्याचा पेपर पाहून तो आपला पेपर लिहू लागला. शिक्षकांनी त्याला पकडले व रागावून ते म्हणाले, "अशी लाचलुचपत आणि लांडी-लबाडी करणार्‍या मुलांचे पुढे काय होते माहीत आहे ना?" विद्यार्थी म्हणाला, "होय सर, पुढे ते पुढारी होतात आणि जनतेला प्रामाणिक राहा असा उपदेश करतात!"

180 likes 31 shares
WhatsApp