Back to feed
S
Shaurya Sharma life · marathi · life

श्वास रोखून धरत एक टाका सोडायचा दुसरा अलगद उचलायचा मग चार उलट चार सुलट आई शिकवायची तेव्हा कटकट वाटायची फक्त कधी वीण विसविशीत तर कधी घट्ट ती म्हणायची.... असंच असतं सुरवातीला एखादा जास्तीचा सुटायचा एखादा दाटायचाच... पण मनासारख्या वीणेसाठी श्वास मात्र रोखायचा सांगायची .. टप्प्यावर धागे बदलताना जोड नकोत दिसायला सोडलेल्या टाक्यांचे भगदाड नको वाटायला आणि तेच पुन्हा ओवतांना नक्षीत हवेत शोभायला तेव्हा वाटायचं... हिला काय आहे बोलायला ! पण आज इतक्या वर्षांनंतर सारं सारं उमगतयं एक मन जपताना दुसरं सुटेलस वाटतय तरी ओवून सारं एकत्र नक्षीत घ्यायला जमतयं मुलांचे चार सुलट सासूबाईंचे चार उलट यजमानांचे एक उलट दुसरा सुलट माझे ? गरजे नुसार कधी चार सोडायचे कधी सुटलेले अलगद उचलायचे हं तसा रंग आता थोडा फिकट होतोय पण असो गुंता कितीही उकल करता येतेय नक्षी असो कठिण कितीही वीण घालता येतेय.

233 likes 64 shares
WhatsApp