Back to feed
D
Diya Reddy Family · Marathi · Family

सगळ्यांच आपल एक वेगळ मत असत आणी ते मांडायचा सगळ्यांनाच अधिकार असतो.. जेव्हा कुणी आपल्याला सोडून जात आणी नात तोडून टाकतो, तेव्हा त्याला दोष देऊन काहीच फायदा नसतो कारण तेव्हा आपलीच चुकी असते जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या जीवावर येत त्याला गुदमरल्यासारख आणी घुसमटल्यावानी होत तेव्हा तो त्याला जिथ मोकळा श्वास घेता येईल तिथ जायचा प्रयन्त करत असतो.. पाण्यात बुडाल्यावर आपण जसा आपला जीव वाचण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयन्त करत असतो कशाचाही विचार न करता.. तसच नात्यामध्येही होत समोरच्या व्यक्तीला गुदमरल्यासारख झाल की तो धडपड करतो त्यातून बाहेर येण्यासाठी कशाचाही विचार न करता मग आपण त्यांच्यावर बंधन थोपतो त्याला अडकवून ठेवतो.. असच कर ,तसच कर, हे नको करू. ते नको करू. असच रहा तसच रहा.. वैगरे बंधनात त्याला अडकवण्याचा प्रतन्त करतो आणी यात त्याचा जीव गुदमरतो घुसमटतो आणी मग तो धडपडतो यातुन बाहेर येण्यासाठी आणी हे सहाजीकच आहे स्वतःला त्रास होत असला की माणूस त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी काहीही करतो .. नात टिकवण्यासाठी समजूतदार पणा हवा, त्याग करण्यासाठी मोठ मन हव, काहीतरी मिळवायच असेल तर काहीतरी गमवावच लागत.. आपल्या माणसाची साथ हवी असेल तर त्याला जे आवडत ते स्वीकाराव लागत स्वतःला थोडफार तरी बदलावावाच लागत.. समोरच्याच मत त्याला मांडूद्या त्याचही मन आहे त्यालाही त्याच्या मनाप्रमाणे जगण्याचा पुर्ण हक्क आहे त्याच्या आवडी निवडी वेगळ्याही असु शकतात आणी वेगळ्या असतील तर त्या स्वीकाराव्या लागतात आपल्याला.. ( समोरच्या माणसाला जर गुदमरल्यावानी नाही झाल त्याची घुसमट नाही झाली तर नात नाही तुटत आपण फक्त आपल पाहतो आणी आपला विचार करतो.. जेव्हा आपण आपला विचार करायचा सोडून जेव्हा त्याला काय पाहीजे असा विचार करू तेव्हा त्यालाही त्याची जाणीव होईल आणी तोही असाच विचार करीन तो पण तुम्हाला न सांगता तुमच्या मनासारख करायचा प्रयन्त नक्कीच करीन.. माझ पटत नसेल तर एकदा स्वतःचा विचार करायचा सोडून दुस-याचा विचार नक्कीच करून पहा त्याला थोडा वेळ द्या आणी बघा त्या माणसात कसा बदल घडून येतो ते..) 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

117 likes 38 shares
WhatsApp