A
Avni Gupta
life · marathi · life
सांगाव्या मी तुलाच, साऱ्या कल्पना सुखाच्या.. ... पोहचाव्या तुझ्या पर्यंत स्वप्न पूर्तीच्या कहाण्या...! कळवाव्या मी तुला, साऱ्या ध्येय योजना.. असे करू.. तसे करू.. यश प्राप्तीच्या निशाण्या...! चित्ररूपे आकारशी तू, शब्द माझे बोललेले.. अनुभवे साकारशी तू, इच्छित मतित पेरलेले...! तूच माझा सोबती, वाट जगी चालताना.. तूच माझा सखा, आकांक्षेप्रत पोहोचताना...!
227 likes
23 shares