Back to feed
M
Myra Deshmukh love · marathi · romantic

*सोडून दिलंय मी* रोजच तुझ्यासाठी झुरण बंद केलय आता मी तुझ्यासाठी अश्रू ढाळण सोडूनच दिलंय मी. तुझ प्रेम आहे का नाही याचा पुरावा नाही मागितला तुझा विश्वास आहे का नाही हे पण नाही विचारणार तुला. तुझ्यासाठी तिळ तिळ तुटण कधीच बंद केलय मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करण कायमच सोडलय मी. रात्रीला जागून स्वप्न पाहण आता जमत नाही मला तुझ मला उगीच फसवण शेवटी कळच गं मला. खूप हवी हवीशी वाटायचीस तू आता आठवण ही नकोशी वाटते कधीकाळी माझीच होती तू आता आपल म्हणायला लाज वाटते. 💝💝💝💝💝💝💝💝💝💝

177 likes 63 shares
WhatsApp