Back to feed
V
Vivaan Das family · marathi · family

सातारा आणि सांगली जिल्हा मध्ये असे काही शब्द आहेत की, जे जगाच्या❤ पाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्हाला ऐकाला मिळणार नाहीत. डबरा😝 (खड्डा) ल्हिव😝 (लिहीने) कोर्ड्यास😝 (रस्सा भाजी) भगुलं😝 (पातेलं) चिच्चा😆(चींच) चिच्चुकं😆 (चिंचेच्या बिया) खाँणड़😝 ( वासरू) रेडकु😝(म्हैशिच पिल्लू) पिटिव 😝( पेटव) खोबरेल त्याल😝 (नारळ तेल) एशेल त्याल 😆 (गोडेतेल) म्या😝 (मी) च्या 😝(चहा) फवं😝(पोहे) ईस्कुट😝 (खेळ खंडोबा) वज्ज😝 (ओझे) गबस😝 (गप्प बस) लांबडं😝😝😝😝 (साप) कानावला😝 (करंजी) आदुगर😝 (आधी) वाडूळ😆(बराच वेळ) कळवंडणे😆(भांडणे) इचार😝 (विचारणे) आडगं 😝(वेडा) निवद 😝(नैवेद्य) गुळमाट😝 (गोड) हान /बडीव 😝(मार) ढांपी😝 (फांदी) शिस्तात😝 (हळू) कडं कडनं सुट😝 (परत जा) बारडी😝 (बादली) डांब😆 (खांब) गुडग्यात मेंदू 😝(अर्धवट) महादबा रोड😆 (महाद्वार रोड) लज्गरी😆(लक्जरी बस) टाम्याटु 😝(टोमॅटो) हारकलाईस काय😝😝 (रोमांचित) हरखून टुम्म😝 (एकदम खुश) टक्कुरं😝् (डोकं) साळुता😆(झाडू) बसल्या बैठकीला😆(लगेच) वळका बघू😝 (ओळखा पाहू) डोस्क्यात काय इना😝 (आठवेना) घुमीव😝 (फिरव) हान😝 (मार) रगात😝 (रक्त) गप गार😝 (चिडी चुप) ढोपार फुडीन😆(कोपर फोडीन) लय राघु वानी बोलु नगस😆(मस्का मारू नको) इरुन फिरुन गंगावेश (पुन्हा तिथेच) डोस्कं😆 (डोकं) बुंडुकल्या 😝(छोट्या) हेंगाड😝 (वेडपट) भस्का 😝(भगदाड) वाइच😝 (थोडे) कुटं हुतास😝 (कोठे होतास) आंग तिथं😆 (हा तिथे) यदुळा😆 (या वेळी) लय😆(खूप) ट्याक्टर😆(ट्रँक्टर) हितं😆(इथे) आईतवारी😆 (रविवार) सोमार😆 (सोमवार) बेस्तरवार😆 (गुरुवार) सुक्कीरवार😆 (शुक्रवार) धुरळा😆 (धूळ) आंतराळी😆(अधांतरी) हे शब्द तुम्हाला सातारा मध्येच ऐकायला मिळतील.👍👍 आमचा सातारा आमची सांगली 😘😘✌✌😎😎

25 likes 5 shares
WhatsApp