•• *स्त्रिचा पदर* काय जादुई शब्द आहे *हो मराठीतला !* काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन अक्षरी शब्द. *पण केवढं विश्व* *सामावलेलं आहे त्यात....!!* किती अर्थ, किती महत्त्व... काय आहे हा पदर.......? *साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खाद्यावर* *रुळणारा मीटर दीड मीटर लांबीचा* *भाग.......!!* तो स्त्रीच्या *लज्जेचं रक्षण* तर करतोच, सगळ्यात महत्त्वाचं हे कामच त्याचं. पण, आणखी ही बरीच *कर्तव्यं* पार पाडत असतो. या पदराचा उपयोग स्त्री केव्हा, कसा अन् कशासाठी करेल, ते सांगताच येत नाही. सौंदर्य खुलवण्यासाठी *सुंदरसा* पदर असलेली *साडी* निवडते. सण-समारंभात तर छान-छान *पदरांची* जणू स्पर्धाच लागलेली असते. सगळ्या जणींमध्ये चर्चाही तीच. .....!! लहान मूल आणि *आईचा पदर,* हे अजब नातं आहे. मूल तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन *अमृत प्राशन* करण्याचा हक्क बजावतं. .....!! जरा मोठं झालं, वरण-भात खाऊ लागलं, की *त्याचं तोंड पुसायला* आई पटकन तिचा *पदर* पुढे करते .... मूल अजून मोठं झालं, शाळेत जाऊ लागलं, की रस्त्यानं चाल-ताना आईच्या *पदराचाच आधार* लागतो. एवढंच काय, जेवण झाल्यावर हात धुतला, की टाॅवेल ऐवजी *आईचा पदरच* शोधतं आणी आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात मुलानं *पदराला नाक* जरी पुसलं, तरी *ती रागावत नाही ...* त्याला बाबा जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला *आईचा पदरच सापडतो.....!!* महाराष्ट्रात तो *डाव्या खांद्या वरून* मागे सोडला जातो.....!! तर गुजरात, मध्य प्रदेशात *उजव्या खांद्यावरून* पुढं मोराच्या. पिसाऱ्यासारखा फुलतो ....!! काही कुटुंबात मोठ्या माणसांचा मान राखण्यासाठी सुना पदरानं *चेहरा झाकून घेतात ..* तर काही जणी आपला लटका , राग दर्शवण्यासाठी मोठ्या फणकाऱ्यानं *पदरच झटकतात !* सौभाग्यवतीची *ओटी* भरायची ती पदरातच अन् *संक्रांतीचं वाण* लुटायचं ते *पदर* लावूनच. बाहेर जाताना *उन्हाची दाहकता* थांबवण्यासाठी पदरच डोक्यावर *ओढला जातो,* तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच *छान ऊब* मिळते....!! काही गोष्टी *लक्षात ठेवण्यासाठी* पदरालाच *गाठ* बांधली जाते . अन् नव्या नवरीच्या *जन्माची गाठ* ही नवरीच्या पदरालाच, नवरदेवाच्या उपरण्यासोबतच बांधली जाते.....!! *पदर हा शब्द किती अर्थांनी* *वापरला जातो ना.....?* नवी. नवरी नवऱ्याशी बोलताना *पदराशी चाळे करते,* पण संसाराचा संसाराचा *राडा दिसला,* की पदर *कमरेला खोचून* कामाला लागते देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना .....? माझ्या *चुका " पदरात " घे.‘* मुलगी मोठी झाली, की *आई* तिला साडी नेसायला शिकवते, पदर सावरायला शिकवते अन् काय म्हणते अगं, *चालताना तू पडलीस* *तरी चालेल. ....!!* *पण, " पदर " पडू देऊ नकोस !* अशी आपली *भारतीय संस्कृती.* अहो अशा सुसंस्कृत आणी सभ्य मुलींचा *विनयभंग* तर दुरच् ती. रस्त्यावरून चालताना लोकं तिच्याकडे *वर नजर* करून साधे पाहणार ही नाहीत.. ऊलटे तिला वाट देण्या साठी बाजुला सरकतील एवढी ताकत असते त्या *"पदरात" ....... *ही आहे आपली भारतीय संस्कृती* *स्त्री चा आदर करा
87 likes
22 shares