A
Anaya Nair
friendship · marathi · friendship
स्थळ पुणे. दोन युवक. अतिशय आनंदात. तिसरा मित्र भेटतो. मित्र: काय रे? आज एकदम एवढे खुश ? युवक 1: अरे तुला सांगणारच होतो फोन करून, आम्हाला दोघांना नोकरी लागली. मित्र: दोघांना एकदम? युवक 2: एकदम सोड. एकाच ठिकाणी. एकाच पेट्रोल पंपावर. मित्र: वा. मस्त. गम्मत आहे नाही ! युवक 1 : काम पण सोपं आहे. हा एंट्रन्स ला हेल्मेट देतो.कस्टमर पेट्रोल भरतो. आणि मी, पेट्रोल भरून झालं की त्या कस्टमर कडून एक्झिट ला ते कलेक्ट करतो.
146 likes
45 shares