Back to feed
R
Rohan Rao life · marathi · life

: सुंदर कविता *आधी काळजात रेंज पाहीजे ...* तेच तेच जगणं तेच तेच जीवन रोज रोज तेच सारख सारख जेवण. आयुष्यात कधी कधी थोडातरी चेंज पाहिजे, *ऐकमेकांशी बोलता येते पण आधी* *काळजात रेंज पाहीजे.....* भाऊ भाऊ दुर झाले आईबापाच ओझं झालं, अर्ध अंगण तुझ अन् अर्ध अंगण माझ झालं. थोडतरी काळजात आपुलकीचं कव्हरेज पाहीजे, ऐकमेकांशी बोलता येते पण आधी काळजात रेंज पाहीजे.... हल्ली घरातल्या घरात अंगत पंगत बसत नाही आपुलकी प्रेम जिव्हाळा दुरदुर दिसत नाही. घराघरात प्रत्येकाला आयुष्य अँरेंज पाहीजे, ऐकमेकांशी बोलता येते पण आधी काळजात रेंज पाहीजे.... ऐकमेकांचे सुखदुःख ऐकमेकांनीच वाटायचं आपुलकीनं मायेनं ऐकमेकांना भेटायचं. एकत्र पंगतीत जेवतांनाही शेतातलं ताजे व्हेज पाहिजे, *ऐकमेकांशी बोलता येते पण आधी* *काळजात रेंज पाहिजे !!* गोष्ट तशी जुनीच कावळा चिमणीची पण नव्या जमान्यातली .... कावळा - चिमणीचा पूर्वापार शेजारी. कावळ्याचं घर आजही शेणाचं, आणि चिमणीचं मेणाचं. जोरदार पाऊस झाला. कावळ्याचं घर गेलं वाहून, तो गेला चिमणीकडे धावून. चिमणी आपली पिलातच होती व्यस्त, कावळा आपला भिजून भिजून त्रस्त. असेच मग दिवस गेले.. वर्ष सरली. चिमणीचं पिलू भरारी घेत गेलं परदेशी, आठवणीनं चिमणी रडे फोटो घेऊन उशाशी. पिल्लू परदेशातून काळजी घेई, भरपूर पैसे पाठवी.. पैसे नको पिल्लूचं हवं, चिमणी पैसे साठवी. एके दिवशी आजारी पडली तर कुणीच आलं नाही चिमणीसाठी धावून, कळल्याबरोबर कावळाच मदतीला आला चिमणीचे डोळे गेले अश्रूंनी वाहून. कावळा म्हणाला चिमणीला, विचार फार नको करूस लक्षात ठेव मात्र, घरच्यांसोबत जोडून ठेवावेत आपुलकीचे चार मित्र. वेळप्रसंगी आधार होतात जीवाभावाचे मित्र पक्के, त्यांच्यासोबत जगता येते आनंदाने जीवन अख्खे.

163 likes 37 shares
WhatsApp