Back to feed
K
Krishna Joshi love · marathi · romantic

सुंदर काही तरी लिहायच होत तुझ्या आठवनीत अडकायच होत तु नाही भेटली मग काय झाल तुझ्या कवितांत रमायच होत. सुंदर काही तरी बघायच होत बघुन तुला, चंद्राला विसरायच होत चांदनीला ,तुझ्या स्वप्नासाठी तोडायच होत तुझ्या स्वप्नांसाठी जगायच होत. सुंदर विश्व बनवायच होत छोट घरकुल बनवायच होत तुझ्या माझ्या संसारात रमायच होत सर्व जगाला विसरायच होत. सुंदर स्वप्न बघायच होत स्वप्नात तुला भेटायच होत माझ प्रेम तुला सांगायच होत स्वप्न तुटण्या अगोदर उठायच होत. सुंदर कविता लिहायची होती माझ प्रेम त्यात लिहायच होत कविता तुला द्यायची होती त्या कवितेत तुला माझ करायच होत.

12 likes 36 shares
WhatsApp