Back to feed
N
Navya Nair friendship · marathi · friendship

सोमवारी रात्र: बायको : आज तुम्ही पिऊन आलात ना ? नवरा : हो त्याच काय झालं फॉरेन क्लाएंटला कंपनी द्यावी लागते. मंगळवारी रात्री: बायको : आज परत पिऊन आलात ? नवरा : अरे आज एका मित्राची एंगेजमेंट पार्टी महणून..... बुधवारी रात्री: बायको : आज पण तुम्ही पिऊन आला ? नवरा : अगं, आज एका मित्राचं ब्रेकअप झालं बिचार्‍याच मन नाही दुखवू वाटलं ! गुरूवारी रात्री : बायको : आज ही , आता आज आणखी कोणाचा ब्रेकअप झाला ? नवरा : ब्रेकअप नाही, ऑफिसात कामाचा लोड फार होता. डोकं फार भणभण करायला म्हणून. .... शुक्रवारी रात्री: बायको : आज काय झालं ? नवरा : अगं मंगळवारी ज्या मित्राची एंगेजमेंट झाली ना त्याच॔ आज लग्न होतं म्हणून आनंद साजरा केला. कळलं ना . शनिवारी रात्री: बायको : हम्म.....आज ? नवरा : आज जुने मित्र भेटले त्यांनी मला डिस्को मध्ये घेऊन गेले अन् फार जबरदस्ती केली. मी ही फार ना केली पण शेवटी घ्यावी लागली. रविवारी रात्री : बायको ( रागात ) : आज काय झालं ? नवरा ( तेवढ्याच रागात ) : च्यायला, माणूस कधी स्वतःच्या मनाने नाही का पिऊ शकत !

52 likes 1 shares
WhatsApp