समस्त बायकांसाठी  🙆बायकोच्या मनात काय आहे ते कुठल्या नव-याला कधी कळल आहे का ??? 🙅पण नव-याच्या मनात😇 काय आहे ते प्रत्येक बायकोला मात्र कळत 💁येणा-या रविवारी नव-याला माहित नसत तो काय करणार आहे पण बायकोला मात्र सगळा प्रोग्राम माहित असतो🍹🍗 बायको म्हणजे नव-याची पर्सनल डायरीच असते कधी काय हव, काय नको कोणाचा वाढदिवस आहे, कोणाच लग्न आहे , सगळ तिच्या डोक्यात "सेव" केलेल असत ते सुध्दा "रिमांइडर सकट" 💆चोराची प्रत्येक चाल जशी पोलिसाला कळते, तस नव-याची बायकोला. तिच्या कड़े सर्व पुरावे असतात. पण जो पर्यंत नवरा काही बोलत नाही, तो पर्यंत बायकोमात्र गप्प असते. एकदा का सापडलात कि मग मात्र तुमची ख़ैर नसते. 💇हवामान खात्यापेक्षा बायको दोन पावल पुढेच असते. नव-याच्या चेह-यावरूनच तिला भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळ सगळ्याची कल्पना येते. हो , आणी येणा-या प्रसंगासाठी बाई अगोदरच सज्ज असते. कधी नव-याला प्रेमाने गोंजारायच, आणी कधी दम द्यायचा, तर कधी अश्रुंच ब्रम्हाअस्त्र काढायच हे ती जस अभिमन्यु आईच्या पोटी चक्रव्युह भेदायला शिकला, तस तिही शिकलेली असते. 👰पण बायको असते म्हणून प्रत्येक नवरा संसाराचा गाढा ओढत असतो. बायको म्हणजे संसाररुपी शरीराच ह्रदय असते, ती जोपर्यंत असते तोपर्यंत संसार, 👪 "संसार" असतो जवळ असली की वसंत फुलतो, दुर असली कि शिशीर बोचतो. 👬वेळ प्रसंगी नव-याला फुलाप्रमाणे जपते, समईतल्या वाती सारखी नव-यासाठी जळते, संकटामध्ये कधी दुर्गा होते, तर मुलांनसाठी सरस्वती होते, घरच्यांसाठी अन्नपूर्णा होते, लक्ष्मी होऊन तीळ तीळ पैसा जमवते. 👹शेवटी यमालाही परत फिरायला👺 भाग पाडणारी बायकोच असते.  Dedicated To All The Lovely Ladies...
103 likes
70 shares