Back to feed
N
Nisha Deshmukh Friendship · Mixed · Friendship

संयम हा आयुष्य भर जपायचा गुण, पण आजकाल काहींच्या बाबतीत मात्र * असा म्हणजे (conditions applied )सारखा वापरला जातो. काहीना वाटते काही एका वर्षांपुरताच संयमाची भूमिका, नंतर काय.... सगळे मनासारखे.. परवा काकूचा फोन आला .....बोलता बोलता काकाचा विषय निघाला..... अचानक काकू शांत झाली.....नंतर जरा चिडलेल्या स्वरात काकांची तक्रार सुरू झाली......... म्हातारपण लागले ह्यांना,,,,,, रात्री उशिरा पर्यंत जागुन what"s app वर काय करतात देव जाणे,,,,, एक दिवस हा फोनच फेकून देणार आहे,,,,, नुकताच 50व्या वाढदिवसाला काकूनेच काकाला smartphone भेट दिला होता. माझ्या मुलाच्या शाळेतल्या madam चा एक दिवस मला फोन आला,,,,, आवाजा वरून madam त्रस्त वाटल्या,,,,,, मी लगेच अंदाज बांधला आपल्या मुलासंबंधी नाही हे ,,,,चला जीव भांड्यात पडला Madam रडक्या आवाजात बोलूलागल्या,,,,, सगळे वातावरणच गंभीर झाले ,,,,,,त्यांना धीर देत विचारल्या वर विषयाचे गांभीर्य जाणवले,,,, थरथरत्या आवाजात madam म्हणाल्या,,,, मला माझ्या नवर्‍या पासून वेगळे व्हायचे आहे ,,,,,, शांतता,,,,,,, Madam एकदम सुंदर,तरूण,हुषार, मनमिळाऊ सगळ्या students च्या आवडीच्या , दोन college मधे जाणारी मुले अगदी सधन सुखीसंसाराती ल,,,,,, मग अचानक असे काय झाले असावे,,,,,,,, Madam चा नवरा सध्या whatsapp वरअनेक groupS चा admin म्हणे,,,,,, मग असेच एके दिवशी शाळेतील मित्र मैत्रिणींचा group बनला,,,,,, आता काय,,,,," purani jeans aur guitar.......... " Chatting वाढले,,,,, 24 तास पुरेनात आणि एकदाचे मग भेटा भेटीचे,,,,,gettogether पार पडले ह्याget together चे जसे फायदे तसे नुकसान पण बरेच हं जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या दूर गेलेले पुन्हा जवळ आले जुनाcrush आता ताजा झाला,,,,,, बर इथेच न थांबता त्यांनी लग्न करायचे ठरवले madam ना सांगण्यात आले की सर्व एकत्र राहू,,,,,,,,, एकदा तर एक सासू सुनेला घेउन आली की आमची सुन पुर्वी प्रमाणे आमच्या शी वागेना,,,,, खुप एकटी एकटी रहाते,खोलीत बसुन असते आमचे काही चुकत असेल तर ते आम्हाला सांगा तिच्याशी बोलल्या वर उलगडा झाला की तीon line असते ही काही उदाहरणे,,,,, पण मागच्या 2वर्षात असे अनेक उदाहरणे आहेत की whatsapp मुळे नवरा बायकोतील भांडणे वाढीस लागली दोन वर्षांपूर्वी पालक लहान मुलांच्या तक्रारी घेऊन येत, कि हि मुलं ऐकतच नाहीत। ,,,,सारखी video game नाहीतरmobile game...... आता मात्र उलट होणार दिसते मुल पालकांना घेऊन येणार की आमच्या आई वडिलांना सुधारा आता वरील उदाहरणांबद्दल बोलायचे झाल्यास चूक कोणाची ,,,,,नवर्याची बायकोची,,smartphone वापरणार्याची, whatsapp ची, technology ची, development ची ,,,,,, कोणाची? Development होणे गरजेचे, तंत्रज्ञानाचा विकास होत रहाणार मग हे बुध्दी जीवी माणसाला ठरवावे लागणार कि या विकासाचा उपयोग करायचा की दुरुपयोग।।।।।। म्हणजे संयम,,,,, वागताना, बोलताना नेहमी च यांचे भान गरजेचे वय वाढले की या भानाची जवाबदारी जास्त वाढते माणूस इतर सजिवांनपासून वेगळा आहे तो त्याला मिळालेल्या विकसित मेंदूमुळे आणि त्याची आठवण रहाणे हे गरजेचे झाले आहे,,,,,,,,, यालाच आपण संयम म्हणू यात. 🙏🏼

169 likes 47 shares
WhatsApp