Back to feed
A
Ayaan Mehta Family · Marathi · Family

*सर्वांनी विचार करावा असा हा msg आहे.* *म्हणून टाकला.* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *एका २२ वर्षीय उपवर मुलीच्या बापाला मध्यस्थाने एक स्थळ सुचविले.* मुलगा मोठ्या सिटीमधे नोकरीला आहे . सुस्वरुप आहे . चांगल्या संस्कारातला आहे . आई बाप पण सुस्थितीत आहेत . मुलाचे वय २४ वर्षे आहे . सगळे अनुरुप आहे . *मुलीचा बाप:-* ते सगळे ठिक आहे . पण मुलाला पगार किती ? मध्यस्थ : आहे की चांगला ३० हज्जार रुपये . *मुलीचा बाप:-* ह्या !! शहरामधे ३० हजारने काय होते . *मध्यस्थ:-* दुसरा एक मुलगा आहे .दिसायला ठिक आहे , पण पगार चांगला ५० हज्जार आहे . फक्त त्याचे वय थोडे जास्त आहे ३१ वर्षाचा आहे . *मुलीचा बाप:-* ५० हजार ? शहरात 1BHK तरी परवडेल कां त्याला ? कसा माझ्या पोरीला सुखात ठेवेल तो . *मध्यस्थ:-* अजुन एक स्थळ आहे . मुलगा दिसायला ठिकठाक आहे . अंगाने थोडा सुटलाय आता . थोडेसे टक्कलपण पडलेय ( बुद्धीचे काम करुन करुन ) ,पगारही चांगला १ लाख आहे , पण वय मात्र ३५ आहे हों !! बघा तुम्हाला चालत असेल तर . *मुलीचा बाप:-* काय चाटायचाय एक लाख पगार . मुलगा माझ्या सुंदर मुलीला अनुरुप नको ?? एखादे चांगले स्थळ सुचवा बुवा . मुलगा वयातही बसायला हवा , चांगला पगारही हवा ,घरची परिस्थिती पण चांगली हवी ,दिसायला स्मार्ट हवा . याच्यापुढे याल तेव्हा अगदी अनुरुप स्थळ घेवुन या . त्याप्रमाणे अवघ्या ८ वर्षा नंतर मध्यस्थाला बोलावणे पाठवल्यावर , *मध्यस्थ :* आता आपल्या मुलीला अनुरुप वर शोधणे माझ्या आवाक्या बाहेरचे आहे . आता माझ्याकडे तुमच्या मुलीला अनुरुप असे पस्तिशीचीच स्थळे शिल्लक आहेत . कोणते सुचवू ते सांगा . *मुलीचा बाप :* कोणतेही सुचव . स्थळं आहेत हे काय कमी आहे !! आता माझी मुलगीच अनुरुप राहीली नाही तिथे मी काय अपेक्षा करणार !! *टिप:-* *अतिचावटपणा करुन मुला मुलींच्या आयुष्याचे वाटोळे करु नका.* *सुरवातीला जरी कमी पगार वाटत असला तरी लग्न झाल्यावर मुलामुलींना नवीन उमेद येते.* *परिस्थिती सुधारण्यासाठी दोघे मिळुन जीवतोड मेहनत करतात.* *एकमेकांच्या साथीने आर्थिक अडचणींवर मात करतात.* *मुलांचे आई बापही त्यांच्या पाठीशी असतातच . मुलामुलींना कुणी त्रास सहन करण्यासाठी वाऱ्यावर सोडलेले नसते याची जाणीव मुलींच्या आई बापांनीही ठेवणे आवश्यक आहे . मुलगा मुलगी समानतेच्या युगात तुम्हीही थोडे जावई मुलीच्या पाठीशी रहा.* *पण मुलामुलींची लग्ने कृपया योग्य वयातच करावीत.* *त्यांच्याही भावनांचा विचार करा कीं जरा.*

251 likes 57 shares
WhatsApp