Back to feed
P
Prisha Sharma Family · Marathi · Family

*सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र .....असा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा ....हीच बदलत्या काळाची गरज आहे ....* ✍🏻 मतलबी जाळ्यात नव-याला फसवून अलिप्त संसार थाटू नको, स्वार्थाच्या हेकेखोर शस्त्राने सासरच्या नात्यास छाटू नको .... ✍🏻 आई झाल्यावर मुली तुला आईपणाचे भान येऊ दे, एकत्रित कुटुंबाचे संस्कार तुझ्या बाळांच्या मनावर होऊ दे. ✍🏻 सासूशी उडणा-या खटक्यात बाळांना उगीच ओढू नको, आजी नातवाच्या नात्यावर त्याचा राग काढू नको ..... ✍🏻 सास-याच्या म्हातारपणावर रागेवैतागे घसरु नको, नव्या-जुन्या पिढीमधील दुवा तुच आहे हे विसरु नको ..... ✍🏻 अगदी सख्ख्या भावासारखं दिराबरोबर तुझं भांडण होईल, पण तुझ्या लाडक्यांना खेळणीही तोच काका घेऊन येईल ..... ✍🏻 लहान असो नाहीतर मोठी, नणंद तर चेष्टेने त्रास देणारच. मांडीवर घेत तुझ्या पिलांना चिऊ काऊचा घास भरवणारच .... ✍🏻 तुझं-माझं भेदभावनेने जावेच्या पोरांचा द्वेष करू नको, वेळ प्रसंगी तिच्या लाडक्यांना दोन घास जास्त देण्यास मागे सरु नको .... ✍🏻 घरातल्या क्षुल्लक कुरबुरींना द्वेषपूर्ण उत्तर देऊन काय करशील ? अग, जशास तसे उत्तर देऊन, एक दिवस घराचे घरपण मारशील ..... ✍🏻 नातेवाईकाना धरुन राहिली तर सर्वांच्या मनात घर करुन रहाशील, तुझ्या पाखरांची उंच भरारी तु सर्वांबरोबर आनंदात पहाशील. ✍🏻 शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत आणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही वृध्दश्रमात कधीच जाणार नाहीत !! ..... 🙏 *सर्वांनी जास्तीत-जास्त शेअर करा*🙏

226 likes 8 shares
WhatsApp