Back to feed
R
Rudra Agarwal love · marathi · romantic

हा आठवणींचा अस्ताव्यस्त पसारा की वार्‍याने... पाचोळा थरथरणारा रणरणत्या उष्ण झळांच्या येता लाटा लपतात कुठे त्या जुनाट पाऊलवाटा.. वाळले पान कोणत्या तरुचे आहे जे पाहुन मजला छद्मी हासत आहे गे तुझ्या बटांची मला आठवण येते खांद्यावर त्यांची वर्दळ भासत आहे.. आटल्या झर्‍यातुन हाक कुणाची येते ते कोण मला भिजण्याची ग्वाही देते मी बसतो त्या चिंचोळ्या खडकावरती तू रंगवलेली रांगोळी ठसठसते... आभाळ रिकामे दिसते क्रूर निळाई विझल्या क्षितिजावर विस्तव चमकत नाही मी माझ्यामध्ये बराच उरलो आहे त्यामुळेच येथे मजला करमत नाही... मौनात कधी वाजते बांगडी हिरवी नंतर कळते तू माझ्यासोबत नाही मी शोधत बसतो तुकडे गतकाळाचे पण तुकडा कोरासुद्धा गवसत नाही...

90 likes 27 shares
WhatsApp