Back to feed
K
Krishna Rao humor · marathi · humor

हेला म्हणायचा जोक..... एका तालुक्याच्या गावी कीर्तन सुरू असतं कीर्तनाला प्रचंड मोठी गर्दी असते... माईक वरून कीर्तनकार अगदी रंगात येऊन कीर्तन सांगत असताना त्यांच्या हाती एक चिट्ठी दिली जाते... कीर्तन थांबवून ते अनाऊन्समेंट करतात .. "सर्जेराव पाटील कुठं बी असतील त्यांनी ताबडतोब घरी जावं .. सूनंदा वहिनी त्यांची घरी वाट पाहत आहेत..." गर्दीतले सर्जेराव उठतात आणि घराकडे निघू लागतात... तेवढ्यात बायकांच्या गर्दीत असलेल्या त्यांच्या पत्नी सुंनदाबाई उठून त्यांना ओरडतात, "बसा बसा....कीर्तन ऐका... मी फक्त चेक करायला सांगितल कीर्तनाला गेलाय, की कुठे उलथलाय 🤣🤣🤣🤣

122 likes 84 shares
WhatsApp