० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ नंबर नऊ ने नंबर आठ ला चापट मारली... नंबर आठ रडायला लागला नंबर आठ ने नंबर नऊला विचारले दादा मला का मारले? नंबर नऊ त्याला म्हणाला मी मोठा आहे म्हणून तुला मारले... हे ऐकून नंबर आठ ने नंबर सात ला चापट मारली... आणि जी गोष्ट नंबर नऊ ने नंबर आठला सांगितली तीच त्याने सातला सांगितली... नंतर नंबर सात ने सहाला, सहा ने पाच ला पाच ने चार ला चार ने तीन ला तीन ने दोन ला व दोन ने एक ला चापट मारली... पण नंबर एक बिचारा कोणाला काहीही बोलला नाही कारण तो हुशार होता... त्याच्या खाली नंबर शून्य होता त्याने शून्याला चापट नाही मारली. उलट त्याला उचलून आपल्या शेजारी बसवल व स्वतःची ताकद वाढवली. आता नंबर एक ची ताकद दहा झाली.... असे असंख्य शुन्य आपल्या आजुबाजुला असतात. नेहमीच तो लहान आहे गरीब आहे, म्हणून त्याला कमी समजू नका. तोच शून्य एकाची किंमत दहा करू शकतो...... प्रत्येक मित्र जोडा, माणूस जोडा, जग हे प्रेमाने जिंकता येतेे......
V
Vivaan Gupta
friendship · marathi · friendship
255 likes
89 shares