२ वर्षांपूर्वी कुटुंबियांकडून माझ्यावर जबरदस्त दबाव असल्या कारणाने लग्नाकरता माझ्या आईने माझी एका सुंदर मुलीशी भेट घालून दिली. भेटल्यानंतर त्या मुलीने मला मी खाजगी नोकरी करीत असल्यामुळे नापसंत करत रिजेक्ट केलं. मी तिला चिडून बोललो की, " तू मला नकार देवून चूक करते आहेस, अगं दोन वर्षानंतर हीच नोकरी मला किती उच्च पदावर घेवून जाईल हे तू बघशीलच." शेवटी एक वर्षानंतर त्या मुलीचं लग्न झालं जे होणारच होतं. 😔 परवा.... मी त्या सुंदर मुलीला तिच्या नवरयासोबत Brand New Corolla कार मध्ये ट्रॅफिक सिग्नलवर बघितलं. त्यावेळी मी माझ्या बाईकला किक मारत होतो कारण तिची बॅटरी काम करत नव्हती. तिनं आपल्या कार मधनं माझ्याकडं बघितलं. पण मी Helmet घातलेलं असल्यामुळे ती मला ओळखू शकली नाही आणि ती दुसरीकडे बघायला लागली. त्यावेळी मला हेल्मेटचं महत्व समजलं. त्यामुळे आपल्या सेफ्टीसाठी नेहमी Helmet आवश्य वापरा. जे आपल्याला ताठ मानेनं जगण्याचा मार्ग दाखवेल व कधीही वरमल्याची जाणिव होवू देणार नाही. 😜 काळजीपूर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद.🤗😆
R
Reyansh Yadav
spiritual · mixed · spiritual
55 likes
57 shares