दि.०८/११/२०१६ माझ्या तरुणानो माझ्या मित्रांनो................... ऊठल्या ऊठल्या सर्व प्रथम आपल्या आई-वडिलांना नमस्कार, दुसरा आपल्या देवाला करा........... संस्काराची आज खरी गरजच आहे संस्कार घ्या त्यांच्या कडुन, त्यां आई-वडिलांना नित्य स्मरा....... ज्यांनी जन्म दिला,हे विश्व दाखवीले त्यांना दुखवु नका आयुष्य भर, मनापासुन त्यांचा सांभाळ करा....... आपल्या जीवाचा आटा पिटा केला नका सोडु त्यांना अर्ध्यावर, थोडा मनापासुन विचार करा.......... करा त्यांची सेवा ते आहेत तो पर्यंत नका पाहु त्यांचा कधीचं अंत, जीवणाचा आहे हा खेळ सारा...... आयुष्य भर कष्टानं कमावल आणि लावलं आपल्याच मुखी, त्यांच्या सुखा साठी प्रार्थना करा..... नाही राखुन ठेवलं म्हातारपणा साठी राखलं ते आपल्या शिक्षणा साठी, त्यांचा तो प्रयत्नच होता खरा........ ऊतार वयात त्यांचे अश्रु बघु नका अश्रु येण्या सारखं करु नका, कष्ट करणातच वेळ गेला सारा...... त्यांच्या मेहनतीला कधी न पाहीलं तरी ही आपल्याला शिक्षीत केलं, आठवणीने त्यांच चरणं धरा....... विसरु नका कधीचं त्यांना,ज्यांच्या मुळे आपण आजं जगं पाहील, त्यांच्या आंतर्यामी आनंदि-आनंद चराचरात भरा..... माझ्या तरुणांनो,माझ्या मित्रांनो... पैसा म्हणजे जीवन नाही,तर पैसा म्हणजे लाख मोलाचा आपला जन्म दाता "आई-बाप"...... तरुणांनो अरे...... माझ्या मित्रांनो..... श्री.दत्तात्रय शिवराम धनावडे कोळसेवाडी, कल्याण भ्रमणध्वनी :-९८२१३४५१०१
130 likes
79 shares