Back to feed
S
Sara Iyer Life · Marathi · Life

30 मिनीट चालण्याचे ३० फायदे जर आपण सकाळी लवकर ऊठुन ३० मिनीटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन. !! कारण आपण दिर्घायुष्यी आहार व आपण आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा.दररोज ३० मिनीटे चालण्याचे फायदे 🚶१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार 🚶२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार 🚶३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार 🚶४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार 🚶५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो. 🚶६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते. 🚶७. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. 🚶८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो. 🚶९. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत 🚶१०. चालण्यामुळे झोपही चांगली लागते. 🚶११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. 🚶१२. वजन कमी करण्याचा किंवा वजन वाढविण्यासाठी उत्तम 🏃१३. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते 🚶१४. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते. 🚶१५. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे. 🚶१६. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात. 🚶१७. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो . 🚶१८. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते. 🚶१९. नियमित चालणारयांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. 🚶२०. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते. 🚶२१. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते. 🚶२२. हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते. 🚶२३. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात 🚶२४. मोतीबिंदु ची शक्यता कमी होते. 🚶२५. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासुन बचाव 🚶२६. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी उपयोग. 🚶२७. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते 🚶२८. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते. 🚶२९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. 🚶३०. चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्रकधीही येत नाही. 🏃३१. चालणे हा नैसर्गिक गुणधर्म आहे त्यामुळे चालणे टाळू नका. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!

5 likes 8 shares
WhatsApp