Back to feed
A
Ayaan Joshi Life · Marathi · Life

----------------------------- *एकदा "मीपणा" विकून पहा.....* *जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट* *आपण इतके दिवस* *बाळगत होतो...???* *बोलावे तर विचार करुन....* *नाहीतर बडबड सगळेच करतात....* *ऐकावे तर अंतःकरणातून.....* *आरोळी तर सारेच देतात....!* *टिपावं तर अचूक टिपावं....* *नेम तर सारेच धरतात....* *शिकावं तर माफ करायला....* *राग तर सगळेच करतात....!* *खळगी भरावी तर उपाशी पोटाची....* *पोट भरुन तर सारेच जेवतात....* *प्यावे तर दुसऱ्याच्या दुःखाचे विष...* *सुखाचे घोट तर सारेच घेतात...!* *जगावं तर इतरांसाठी....* *स्वतःसाठी तर सगळेच जगतात....* *ठेवावा तर शत्रुवर पण विश्वास...* *घात तर सारेच करतात...!* *दुःखामधे सुद्धा रहावं हसत* *वेळ तर सर्वाँचीच येते....* *झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं* *राख तर सर्वाँचीच होते...* 🙏🏽🙏🏽🙏🏽

9 likes 3 shares
WhatsApp