. -------------------- "राम" म्हण, "अल्ला" म्हण "येशू" म्हण, "साई" म्हण "देव" म्हण, "दूत" म्हण "अवतार" म्हण, "काही" म्हण . . मी हरकत घेण्याचंही कारण नाही काही.. पण माणूस म्हणून एक गोष्ट खरंच पटत नाही ! . तू हवी त्याची पूजा कर हवी त्याची आरती गा मॅगी, पिझ्झा, चिकन, मटन प्रसाद म्हणून काही खा ! . . चोविस तास देव देव कर वाटल्यास विसर घर पण माझ्यासाठी दोस्ता फक्त एवढा विचार कर ! . . देव म्हणजे सुपर पाॅवर ब्रम्हांडावर ताबा मग त्याचं आॅफिस गल्लीबोळात कशाला रे बाबा ? . . ऐकलं होतं.. देव असतो उभा सत्त्यापाठी ! तरी त्याच्या अवती भवती दलालांची दाटी ? . . चोर, डाकू, बलात्कारी सारेच त्याचे भक्त देव काय नुसते चेहरे बघत बसतो फक्त ? . . असा कसा चिडत नाही त्याला नाही भान ? वरून तुझ्यासारखे मूर्ख तिथंच देतात दान ! . . देवळा भवती भिकारी लुळे पांगळे जीव ज्याला असेल काळीज त्याला पाहून येते कीव ! . . प्रश्न त्यांचे सुटत नाहीत दुःख सरत नाही तरी तुझा सुपर देव काहीच करत नाही ! . म्हणून म्हणतो डोकं वापर गहाण नको ठेऊ भुकेल्याला, तहानल्याला घाल कधी जेवू ! . अनाथ, कोवळ्या हातामधे पाटी-पुस्तक ठेव आई शप्पथ तुला सांगतो तूच होशील देव !
220 likes
51 shares