A
Aadhya Chauhan
Friendship · Marathi · Friendship
✍🏻 *ओढ म्हणजे काय?* हे जीव लावल्याशिवाय कळत नाही... *प्रेम म्हणजे काय?* हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही... *विरह म्हणजे काय?* हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही... *जिंकण म्हणजे काय?* हे हरल्याशिवाय कळत नाही... *दुःख म्हणजे काय?* हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही... *सुख म्हणजे काय?* हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही... *समाधान म्हणजे काय?* हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही... *मैत्री म्हणजे काय?* हे ती केल्याशिवाय कळत नाही... *आपली माणस कोण?* हे संकटांशिवाय कळत नाही... *सत्य म्हणजे काय?* हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही... *उत्तर म्हणजे काय?* हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही... *जबाबदारी म्हणजे काय?* हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही... *काळ म्हणजे काय?* हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
116 likes
20 shares