S
Sara Yadav
Love · Marathi · Motivation
अजून एक रात आली फिरूनी परसात माझीया घेवून लहरते स्वप्नांचे रेशीम झुले निल गगनीं उंच उंच झेपावया अजून एक चमेली हसते हिरव्या कंच पानांच्या पसा-यामागे अजून एक चकोर वेडा होतो कासावीस खट्याळ चांदणी मागे अजून एक अल्लड पाऊल वऴते हलकेच सागर रुपेरी वाटेला अजून एक आतूर चाहूल छेडते सतत मनाच्या आर्त सूराला अजून एक गहिवर दाटतो कंठात पाहतो वाट बस एका क्षणाची शोधतात संधी तनीचे रोम रोम तूझ्या कुशीत कायमचे विलीन होण्याची
0 likes
0 shares