*अप्रतिम संदेश* पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वा-याने अचानक पडलं. दोघं जणं शब्दं संपल्यासारखे बसून होते. त्याने तिला पंखानी जवळ घेतलं. थरथरत्या पंखानी ती ही कुशीत शिरली. *चिमणा* - "सकाळी बोलूयात" *चिमणी* - "हो" रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला.चिमणा उत्साहानी म्हणाला, "निघूया? पुन्हा नव्या काड्या आणू. "तिच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा - "अग वेडे, *पाडणं* त्याच्या हातात आहे तर *बांधणं* आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण *माणसं* थोडीच आहोत!चल निघूया" आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली...यालाच *जगणे* म्हणतात... 😊☝🏻🤗
167 likes
16 shares