Back to feed
A
Atharv Singh Life · Marathi · Life

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर ! अरे, संसार संसार, खोटा कधी म्हणू नये राउळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये अरे, संसार संसार, नाही रडनं, कुढनं येड्या, गळ्यातला हार, म्हणू नको रे लोढणं ! अरे, संसार संसार, दोन जिवांचा विचार देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार बाहीणाबाई चौधरी

70 likes 28 shares
WhatsApp