Back to feed
K
Krishna Joshi Friendship · Marathi · Friendship

*अवश्य वाचा...* एके दिवशी एका शाळेतील शिक्षिकेने बोर्डावर खालील समीकरण लिहीलं: 9×1=7 9×2=18 9×3=27 9×4=36 9×5=45 9×6=54 9×7=63 9×8=72 9×9=81 9×10=90 जेव्हा तिने ते पूर्ण केलं आणि विद्यार्थ्यांकडे पाहीले तेव्हा सर्व विद्यार्थी तिला हसत होते, कारण पहीले समीकरण चुकले होते. तेव्हा ती शिक्षीका त्यांना म्हणाली; मी पहील समीकरण जाणीवपूर्वक चुकीच लिहीले, कारण मला तुम्हाला काहीतरी महत्वाच सांगायचं आहे. हे तुमच्यासाठी आहे, की, हे जग तुमच्याशी कशा प्रकारे वागते. तुम्ही बघा, मी नऊ वेळा *बरोबर* लिहीलं, पण कोणीही माझं अभिनंदन केल नाही. परंतु मी *एक* चुक केली त्याला तुम्ही सर्वजण मला हसलास. म्हणूनच हा एक धडा आहे *तुम्ही लाखो चांगल्या गोष्टी केलात तरी हे जग तुम्हाला प्रोत्साहीत करणार नाही, परंतु तुमच्या एका चुकेला हसतील आणि टीकाही करतील...* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

181 likes 5 shares
WhatsApp