अशीच आहे ती ... भिरभिर डोळ्यांनी माझी वाट बघणारी "किती रे उशीर ..?" असं म्हणून भांडणारी "मी वेळेवर आलोय तूच आधी येऊन बसलीस" असं बोलल्यावर हळूच "सॉरी" बोलून जीभ चावणारी .... अशीच आहे ती ....... पावसात चालताना वीज कडाडल्यावर घाबरून मला बिलगणारी अन दुस-याच क्षणी लाजून दूर होणारी "अरे भिजू नकोस आजारी पडशील" असं मला सांगून स्वत:च भिजणारी ... अशीच आहे ती ..... मी गर्दीत दिसेनासा झाल्यावर कावरीबावरी होऊन मला शोधणारी "हात का सोडलास रे..?हरवला असतास तर ..?" असं बोलून पुन्हा माझा हात घट्ट पकडणारी अशीच आहे ती .......... मी दिलेलं गुलाबाचं फुल पुस्तकात जपून ठेवणारी मी केलेली प्रत्येक कविता समजली नाही तरी "वा खूप छान!" बोलणारी माझी प्रत्येक आठवण जीवापाड जपणारी मला पूर्ण करणारी ......अशीच आहे ती ......
0 likes
0 shares