Back to feed
A
Ayaan Nair Love · Marathi · Rain

आज अचानक पावसाच्या अलगद पडल्या सरी , बहिणीचा आला फोन म्हणाली,"इन्नी गेली देवाघरी." देवाघरी? इन्नी राहायची तेच मला वाटायचं देवघर, इन्नीच होती देवी जी अखंड प्रेम करायची सर्वांवर . इन्नीची सकारात्मक दृष्टी अन कायमचा आशावाद, खचल्या मनाला उभारी अन विश्वास व्हायचा आबाद . न तब्येतीच कौतुक न केली कधी कसली कुरकूर , स्वतः आनंदी राहून तिनी आनंद वाटला भरपूर . मावशी माझी असली तरी होती आईची माउली, संकटकाळी, गरजेच्यावेळी कायम मदतीला धावली . आजच्या पावसात भिजून वाटले कुशीत मलाच ती धरी, सोडून जाणार? शक्यच नाही. ती वसते आमच्या अंतरी . श्रद्धा तिच्यावर होतीच आज वाहते श्रद्धांजली , शोक नाही भावणार तिला म्हणून हि काव्यांजली .

0 likes 0 shares
WhatsApp