आज जगभर ज्या कँलेंडरनुसार कालगणना केली जाते, तारीख व वार मोजले जातात ,ते ग्रेगेरीयन कँलेंडर ४ ऑक्टोबर १५८२ पासुन लागु झाले. ख्रीस्ती धर्मगुरु तेरावे पोप ग्रेगेरीयन यांच्या नावावर या कालगणनेचे नाव चे नाव ग्रेगेरीयन ठेवले. भारतात इंग्रज येई पर्यंत विक्रम संवत शके ,हि कालगणना जास्त प्रमाणात वापरली जायची. महाराष्ट्रात अनेकजण शिवशके नुसार सुद्धा कालगणना करायचे. ग्रेगरी दिनदर्शिका ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. पोप ग्रेगोरी तेराव्याने फेब्रुवारी २४, इ.स. १५८२ रोजी पोपचा फतवा काढून त्यास अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती जुलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे. ४ ऑक्टोबर १५८२ नंतर पुढिल तारीख १५ ऑक्टोबर १५८२ ही होती. तो पर्यंत प्रचलीत असणार्या ज्सुलियन कँलेंडर मधे लिप ईयरचा विचार केला गेला नव्हता. चार वर्षातुन एकदा येणारा अधिकच्या दिवसाचे गणीत मांडुन १५८२ साली दहा दिवस तारीख पुढे घेतली. भारतीय काल गणने मधे हजारो वर्षा पासुन अधीक मास व क्षय मास याचा विचार केलेला आहे.म्हणजे आपली संस्क्रुती किती तरी प्रगत होती हे लक्षात येते. आणी पुढे याच इंग्रजांनी आम्ही मागास म्हणुन आमच्यावर दिडशे वर्ष राज्य केल. ग्रेगेरीयन कँलेंडर मधे सुद्धा काही ऊणीवा आहेत. त्या लक्षात घेऊन आपले अवकाश संशोधनात महान कामगिरी करणारे वैज्ञानीक विक्रम साराभाई यांनी एका कँलेंडर ची रचना केली होती. त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनाही ते लागु करायच होत, पण काहि ना काहि कारणाने ते आज पर्यंत लागु होऊ शकल नाही. आज सुद्धा भारतात काही लोक ते कँलेंडर लागु व्हाव म्हणुन प्रयत्नशील आहेत.
256 likes
48 shares