आजचा पाऊस कोणासाठी तरी खास सगळीकडे पसरलेला मातीचा सुवास आजचा पाऊस कोणासाठी तरी खास जुन्या आठवणी काढून करणार उदास आजचा पाऊस कोणासाठी तरी खास एकाच छत्रीत भिजण्याची आस आजचा पाऊस कोणासाठी तरी खास ऑफिसला जायचा वाचला त्रास आजचा पाऊस कोणासाठी तरी खास शेतांमधील चैतन्याने घेतला नवा श्वास पण पाउस नेहमीच भेटतो असा हरवलेला जुना सवंगडी जसा💝💝💝💝💝
0 likes
0 shares