आजच्या तरुण पिढीसाठी हीं माझी कळकळीची विनंती ... जरूर विचार करा आणि पटलं तर तुमच्या सर्व मित्रांना पाठवा आणि शेअर करा... सैराट कशासाठी व्हायच, का आपण नकळत्या वयात जवानीच्या धुंदीत एखादा फिल्म पाहून मुलीच्या मागे लागून आयुष्याची धुळधाण करायची, प्रेम आणि लग्न हे एक जीवनाचा सप्तरंगी आनंद आहे पण त्यासाठी एक जबाबदारी, समजूतदारपणा आणि आपल्या आदर्शाच्या पायावर आधी स्वतःला सक्षम आणि यशस्वी बनवा. आज आपल्या देशात फिल्मस्टार्स आणि खेळाडू च्या मागे वेडे होणारे आणि त्यांना आदर्श मानणारे करोडो युवक आहेत. त्यांना जेव्हा मनोरंजनाच्या साधना पेक्षा जास्तीचे महत्व दिले जाते आणि वैचारिक रीतीने follow केले जाते,असे करणारे लोक कधी हीं देशाला आणि समाजाला घडवू शकत नाहीत व समाजात आदर्श निर्माण करू शकत नाहीत. जे व्यक्ती कलेच्या नावाखाली अश्लील दृश्य देण्यास किंचितही लाज बाळगत नाहीत, कोणत्याही खालच्या स्तरावर जाऊन आपल्या आत्म्याचा सौदा करतात ज्याच्या आयुष्यात मूल्याना काही स्थान नाही, अशा लोकांना पाहून आमचे युवक फक्त शिट्टी आणि टाळ्या मारून नकळत स्वतःच मूल्याचे पतन करत असतात. शरीराला त्रासदायक आणि वाईट असलेले शीतपेये, सौंदर्यप्रसाधने फक्त पैश्यापोटी लाखो लोंकाना जाहिरातीच्या माध्यमातून फसवतात आणि आमचे लोक ते काहीही न विचार करत घेतात सुद्धा... ते फसवतात आणि आमचे लोक फसतात फक्त कश्यासाठी ......, न संपणारी पैशाची भूक मिटवण्यासाठी. मित्रानो विसरू नका हीं भूमी शिवाजी राजे, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक , वीर एकलव्य , स्वामी विवेकानंद , महात्मा फुले, संत तुकाराम, ज्ञानेश्वर , एकनाथ , साने गुरुजी अशा अनेक थोर पुरुषांची आहे व यांच्या पासून समृद्ध झाली आहे. कधी आपण विचार केलं का , कि हे थोर व्यक्ती ह्यांना जर आपण आदर्श मानून त्यांचे चरित्र जर घरोघरी वाचले तर ते आपल्या मुलाबाळांना घरातील प्रत्येकासाठी एक आदर्श ठरू शकतात आणि चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात. हे सर्व मी यासाठी लिहीत आहे कि, ज्या आई- बापानी आपल्या साठी अपार कष्ट घेतले, रक्ताचं पाणी केलं त्यांना दुःख आणि अपमानाच्या दरीत आपल्याला टाकायचं आहे का?.... की उज्ज्वल भविष्याचा वेध घेऊन प्रचंड मेहनत आणि चांगल्या संस्काराच्या जोरावर आपला परिवार, समाज, गाव आणि पर्यायाने ह्या देशाच्या विकासात हातभार लावायचा आहे. मार्ग शेवटी प्रत्येकाला निवडायचा आहे...तुमचे भविष्य फक्त तुमच्या हातात आहे. धन्यवाद🙏🙏🙏🙏
6 likes
45 shares