आजही ते कधी कधी, एकमेकांशी बोलतात...!!- . कधी मेसेस मधून, तर कधी फोन मधून...!!- एकमेकांच्या अधून मधून, संपर्कात असतात...!!- . एकमेकांची खबर ठेवणे, आजही त्यांनी सोडलेले नाही...!!- समोरच्याला इग्नोर करणं, आजही त्यांना जमलेलं नाही...!!- जरा काही झालं कि, एकमेकांची काळजी करत बसतात..!!- . कारण आजही ते कधी कधी, एकमेकांशी बोलतात...!!- पण आता पुर्वीसारखं उठ सुठ, ते एकमेकांना फोन करत नाहीत...!!- जर फोन केलाच कोणी तर, काय बोलयाचं दोघांनाही सुचत नाही...!!- . त्या दोघांना वेगळं होऊन, बरेच दिवस झालेत...!!- आता ते फक्त, चांगले मित्र म्हणून राहिलेत...!!- तरी ही कधी कधी जुन्या आठवणी, मनामध्ये हळूच डोकावतात...!!- जेव्हा आज ते कधी कधी, एकमेकांशी बोलतात...!!- . ती टेन्शनमध्ये असली कि, तिचा पहिला फोन त्यालाच असतो..!!- तो ही सगळी कामे बाजूला सारून, तिच्यासाठी हाजीर राहतो...!!- कारण त्याला माहित असतं.... फार काही झाल्या शिवाय, तिचा आवाज काफरत नसतो...!!- तिच्या इतकं जवळच अजून ही, तीच कोणीच नसतं...!!- . मग जोडीदाराच्या नकळत ते, एकमेकांना भेटतात...!!- कारण आजही ते कधी कधी, एकमेकांशी बोलतात...!!- त्याच्यासाठी कधी कधी, ती हि कासावीस होते...!!- विसर विसर म्हणता म्हणता, त्याचीच होऊन राहते...!!- . पण तिच्या भावना ती, शब्दात कधीच मांडत नाही...!!- आणि तो हि बोलताना, तिच्या डोळ्यात कधीच बघत नाही..!!- असं न बोलताच ते, एकमेकांना खूप समजून घेतात...!!- . जेव्हा आज ते कधी कधी, एकमेकांशी बोलतात...!!- दूर जाताना दिलेलं मैत्रीचं वचन, ते असं नेहमीच पाळतात....!!!""
0 likes
0 shares