आजही मी तुझीचं वाट बघतोय गं ................ जीवन जगायचं म्हणुन मी जगतोय, आजही मी तुझीचं गं वाट बघतोयं | तेंव्हा पासुन मी एकटाचं गं जगतोय, नयनी माझ्या सार काही दिसतय गं || जीवन जगायचं म्हणुन......... कधीच झाला होता आपला दुरावा, पण संपला नाही गं अजुन पुरावा | दिसशीलच मला कधी ना कधी तु, म्हणुन आजही ह्रदयात आहेस गं || जीवन जगायचं म्हणुन........ गेले ते दिवस राहील्या गं आठवणी, भारावुनचं जातो तुला पाहता क्षणी | आजही आठवणीत तुझ्याच रमतो, तुझ्या आठवणीत आजही जगतो गं || जीवन जगायचं म्हणुन........ निमित्त म्हणुनच आपण दुर झालो, ना पुन्हा कधी एकत्र येवुन भेटलो | दिसता ही न दिसल्या सारखं केलं गं, पण दु:ख ह्रदयी अजुनही सलतय गं || जीवन जगायचं म्हणुन........ कित्येक वर्ष आपली लोटुन गेली, पण माया मात्र कमी नाही झाली | तुझ्या मनी माझा रागं जरी असला, तरी प्रेम भाव डोळ्यातुन दिसला गं || जीवन जगायचं म्हणुन........ तु दिसलीस तरी मनाला आनंद होतो, कधी सावलीचाही मला भासं होतो | तसा तुला येणारा रागही शहाणा आहे, कधीही समझावुनच घेत असतो गं || जीवन जगायचं म्हणुन........ झालीस जरी वेगळी माझ्या पासुन, तरी आठवणी टाकल्या नाही पुसुन | कधीचं नको गं बसु अशी तु रुसुन, मनाला माझ्या लय दु:ख होतय गं || जीवन जगायचं म्हणुन........ श्वास असे पर्यंत मी तुझाच राहणार, तुझ्या आठवणीतचं मी बेधुंद होणार | तुझ्या विणा मी जगु नाही शकणार गं, काही झालं तरी मी वाट बघणार गं || जीवन जगायचं म्हणुन........ खरच येवुन बघ,अनं थोडी भेटुन बघ, वाटलच तर तु पुन्हा जीव लावुन बघं | आजुनही तुझीच वाट बघतोय गं मी, हवं तर माझ्यावर प्रेम करुन बघं गं || जीवन जगायचं म्हणुन........ खरचं गं जगायच म्हणुन जगतोय...... आजही मी तुझीच वाट बघतोय........ तुझ्या साठीच मी आजही झुरतोय..... तुझ्या साठीचं गं मी पुन्हा मरतोय......
0 likes
0 shares