Back to feed
M
Meera Sharma Love · Marathi · Missing

आठवण आठवणींचा सूर्य उगवतो चंद्र ढलतो तुमच्या सोबतीची उणीव घेऊन की आठवणींची सोबत घेऊन?? चहा होऊ द्या च्या गोड़ हाकेने आठवणीची सकाल होते स्वयंपाकघरातला माझ्यासोबत तुमचा वावर आठवून आता मन हुरहुरते तिखटमीठ लसूणकोकम अगदी बेचव लागते!! केसांवर ब्रश फिरवतानाची गोड़ शील आरशात शोधते तुमचे रंगात रंगणे गाण्यात गुंगणे मातीतून घडवणे , मैफिल जमवणे खरंच आठवण ही नसतानाच येते.. तुमच्याबरोबर सारे घर गायचे रंगात रंगायचे कस स्वीकारु तुमचे नसणे? तुम्ही जे साठवले तेच आता आठवते!! सोबत आता आठवणींची त्या अदृश्य देवासारखी! देव कधी दिसतो का? तरीही तो असतोच अस मनाला समजवायचे खरंच आठवण ही नसतानाच येते...

0 likes 0 shares
WhatsApp